हेपाटयटिस सी
बद्दल अधिक
जाणून घ्या

“मी एकदम ठीक आहे”
परिक्षण करा
बरे व्हा

हेपेटायटीस सी साठी लस नाही पण इलाज आहे1

हेपेटायटीस सी यकृताला खराब करू शकते व यकृताचा कर्करोग होऊ शकतो2

इलाज हेपेटायटीस सी रोगजंतूला दूर करू शकतो3

यकृताचे महत्व4

यकृत आपला सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे तसेच उत्तम स्वास्थ्याची किल्ली आहे. यकृत 500 पेक्षा जास्त कार्य करते, ज्यात समावेश आहे:

 • पित्ताचे उत्पादन, जे पचना दरम्यान चरबीचे विभंजन सुलभ करते.
 • कॉलेस्ट्रॉल आणि विशेष प्रथिन्यांचे उत्पादन, जे चरबीला शरीरात इतरत्र नेण्यासाठी मदत करते.
 • रक्तद्रवासाठी विशिष्ट प्रथिन्यांचे उत्पादन.
 • अतिरिक्त ग्लुकोजचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर (उर्जा साठवण).
 • ग्लुकोज आणि अमायनो ऍसिडच्या रक्त पातळ्यांमध्ये शिस्त लावणे.
 • विविध ड्रग्ज आणि अपायकारक पदार्थापासून रक्ताचे निर्विषिकरण.
 • हिमोग्लोबिनचे प्रक्रियण आणि लोहाची साठवण.
 • अनेक साकळण घटकांना निर्माण करून रक्ताचे साकळणे सुलभ करणे.
 • रक्तप्रवाहालून किटाणूना काढून टाकणे आणि काही रोग प्रतिकारक घटकांची निर्मिती करून संक्रमणाशी लढण्यात मदत करणे.

हेपेटायटीस म्हणजे काय?

"हेपेटायटीस” म्हणजे यकृताची सूज. मद्य अतिरिक्त वापर, शरीरातील रोगजंतूमुळे निर्माण झालेले विष (टॉक्सिन्स), काही औषधी आणि विशिष्ट वैद्यकिय स्थितींमुळे हेपेटायटीस होऊ शकतो. तथापि, हेपेटायटीस सहसा रोगजंतू मुळे होतो2

हेपेटायटीस सी म्हणजे काय?

हेपेटायटीस सी एक रोगजंतू आहे, ज्याला थोडक्यात एचसीवी म्हणतात. एचसीवी यकृताला संसर्ग करते आणि त्यामुळे हेपेटायटीस होतो.2 तीव्र एचसीवी असलेले अंदाजे 25% लोक या काळादरम्यान संपूर्ण बरे झाले.5 तीव्रसंर्सग काही लक्षणं किंवा लक्षणं नसलेले अती कमी आजारपणापासून गंभीरस्थिती ज्यात दवाखान्यात दाखल करण्याची आवश्यकता आहे अश्या तीव्रता श्रेणीमध्ये असते.2
तीव्र एचसीवी विकसित दीर्घकालिन किंवा जुना एचसीवी असलेले जवळपास 75% लोक औषधांनी सफलपणे इलाज केला नाही तर, जुनाट एचसीवीचा यकृताचा सिरॉसिस (व्रण पडणे), यकृताचा कर्करोग, आणि यकृत निकामी होणे होऊ शकते.

भारतात एचसीवी संसर्ग किती सर्व साधारण आहे?

भारतात अंदाजे 1 आणि 100 लोक एचसीवीनी संसर्गीत असू शकतात. असा अंदाज लावला गेला आहे की 2014 मध्ये 2,88,000 नवीन एचसीवी संसर्ग भारतात आले. भारतात दरसाल एचसीवीमुळे 96000 इतके जास्त मृत्यू होतात असा अंदाज आहे.6-8

एचसीव्ही आपल्या यकृताला काय करते?

एचसीव्हीच्या आजाराचा कोर्स

निरोगी यकृत

निरोगी यकृत, जेव्हाही ते क्षतिग्रस्त होते पुन्हा सुधारण्याची किंवा पुन्हा घडण्याची क्षमता ठेवते. हे आपल्या रक्ताला गाळण्याचे, पोषक तत्वांना -प्रक्रिया करण्याचे आणि संसर्गाशी लढा देण्याचे कार्य करते.2,9

फायब्रॉसिस

यकृताच्या रोगामध्ये सुजलेल्या यकृताला व्रण होतात. हे व्रण असलेले ऊतक वाढतात आणि निरोगी यकृत ऊतकात बदलतात. या प्रक्रियेतला फायब्रोसिस असे म्हणतात. या अवस्थेत आपले यकृत कदाचित निरोगी स्थितीप्रमाणे काम करू शकणार नाही.9

सिरोसिस

सिरॉसिस म्हणजे यकृतावर व्रण पडणे आहे ज्यात कठीण व्रण असलेले ऊतक मऊ निरोगी ऊतकामध्ये बदलतात. जर या अवस्थेमध्ये सिरॉसिसचा इलाज केला गेला नाही तर ते योग्यरितीने काम करू शकत नाही आणि यामुळे यकृत निकामी होण्याची शक्यता असते.9

कार्सिनोमा

हेप्टोसेल्युलारकार्सिनोमा (एचसीसी) किंवा यकृताचा कर्करोग है प्राथमिक यकृताच्या कर्करोगाचा सर्वात सर्वसामान्य प्रकार आहे. कर्करोग जो यकृतामध्ये सुरू होतो त्याला प्राथमिक यकृताचा कर्करोग म्हणतात. हे यकृतामध्ये अस्वस्थ पेशीची वाढ आणि पसरण आहे.10

हेपेटायटीस सी होण्याची जोखिम कोणाला असते?

आपल्या शरीरात संकरीत व्यक्तीचे रक्त आल्यास आपल्याला हेपेटायटीस सी होऊ शकतो. हे होते जर

संसर्गीत व्यक्तीची ड्रगची सुई वापरली तर.2,11-13

2001 च्या आधी रक्त चढवले असेल, जेव्हा रक्त हेपेटायटीस सी किवा इत्तर संसर्गासाठी नियमित रूपे परिक्षण केले जायचे नाही.1,2,11-13

हेपेटायटीस सी असणाया आईच्या पोटी जन्म घेतलेल्यांना (आईकडून मुलाला संसर्गीत होण्याची शक्यता 5% असते).1,2,11-13

स्टरलाईझ न केलेले टेंटू किंवा छिद्र करण्याची अवजारे जी संसर्गीत व्यक्तीला वापरली होती त्यांनी.1,2,11-13

चुकून संसर्गीत व्यक्तीला वापरलेली सुई टोचली गेली तर.1,2,11-13

संसर्गीत व्यक्तीची रेझर किंवा टुथब्रश वापरला तर.1,2,11

कधी होमोडायलसिसवर असले तर.2,12

कधी तुरुंगामध्ये काम केले असेल किंवा राहीलेले असेल तर.2,12

क्वचितच संभोगातून हेपेटायटीस सी संसर्गीत होण्याची शक्यता असते.1,2,11-13

सामान्य आहार विषयक सल्ला

आपल्या आहारामध्ये नियमित आणि संतुलित जेवणाचा समावेश असावा ज्यात:14

 • संपूर्ण धान्य ब्रेड आणि धान्य.
 • पुरेसे प्रथीने असलेले खाद्यपदार्थ जसे की मांस, मासे, कठिण कवचाची फळे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ.
 • भरपूर भाज्या आणि फळं.
 • भरपूर पाणी (किमान ६ ते ८ ग्लास दर रोज).

याचा उपयोग मर्यादित करा किंवा टाळाः

 • आहारामध्ये अतिरिक्त मीठ, साखर आणि चरबी.
 • मद्यप्राशन.

हेपेटायटीस सी कसा पसरत नाही?

संसर्गीत व्यक्तीच्या हातात हात दिल्याने किंवा त्याचा हात धरल्याने1,15-16

स्तनपान, अन्न किंवा पाण्याच्या द्वारे1,15

खोकल्यातून आणि शिंकेतून1-16

पोहण्याचा पुल आणि सौनाच्या एकत्र वापराने1-16

मिठी मारण्याने, चुंबन घेतल्याने आणि कवटाळल्याने1-16

एकाच भांड्यात आणि चमच्यानी खाल्याने, एकाच पेल्याने पाणी पिल्याने1-16

एकच संडास आणि स्नानगृह वापरल्याने1-16

एकमेकाचे कपडे घातल्याने1-16

जर मला जर एचसीवी असेल तर मला कसे कळेल?

आपल्याला एचसीवी आहे का हे माहिती करण्याचा फक्त एकच मार्ग आहे परिक्षण करा. डॉक्टर्स दोन प्रकारची परिक्षणे करून एचसिवीचे निदान करतात.2,11

 • a. असे परिक्षण ज्यामध्ये रोगप्रतिकार संस्थेद्वारे रोगजंतूला प्रतिक्रिया करण्यासाठी तयार केलेले रक्तातील प्रतिद्रव्य -प्रथिने तपासले जाते.
 • b. असे परिक्षण ज्यात स्वतः रोगजंतूद्वारे तयार केलेल्या आरएनए नावाच्या पदार्थाला तपासले जाते.2-11

बहुतेक लोकांना नकारात्मक प्रतिद्रव्य परिक्षण येते त्यांना एचसिवी संसर्ग नसतो आणि अधिक चाचण्या करण्याची गरज नसते.

अस्वीकरण:

येथे प्रकाशित महिती निव्वळ हेपटायटीसबद्दल जागरूकता व ज्ञानवृध्दीसाठी आहे. कोणत्याही त्रयस्थ पक्षांप्रतिचे संदर्भ आणि/ किंवा लिंक यांनी मायलनतर्फेचा शेरा किंवा वॉरंटी प्रस्थापित होत नाही. जरी येथे दिलेली माहिती अचूक व अद्यतन असल्याची कसून खात्री केलेली असूनही, येथे प्रकाशित सामग्रीमार्फत प्रसार होणार्‍या कोणत्याही माहितीच्या अचूकतेबाबत मायलनचे कोणतेही उत्तरदायित्व नसून त्याचे प्रतिनिधित्व करत नाही तसेच कुठल्याही चुकीच्या, सुटले गेल्यामुळेचे परिणाम- कायदेशीर किंवा अन्यथा, इथे पुरवलेल्या माहितीच्या वापरामुळे आणि त्यापासून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही गोष्टींसाठी उत्तरदायी धरता येणार नसून मायलन त्यांचे स्पष्टरीत्या अस्वीकरण करते.

हेपटायटीसबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपले मार्गदर्शन करण्यासाठी आपले डॉक्टर सर्वोत्तम व्यक्ती आहेत. येथे पुरवलेली माहिती आपल्या डॉक्टरने दिलेल्या महितीला प्रतिस्थापित करत नाही.

References:

 1. 1. NHS Hepatitis C Symptoms. Available from: http://www.nhs.uk/Conditions/Hepatitis-C/Pages/Symptoms aspx. Accessed on 22nd February 2015.
 2. 2. CDC, Hepatitis C General information. Available from: http://www.cdc.gov/hepatitis/HCV/PDFs/HepCZGeneralFactSheet.pdf. Accessed on 22nd March 2015.
 3. 3. Treatment of Hepatitis C Up to date. Available at https://www.uptodate.com/contents/hepatitis-c-beyond-thebasics#H17555986. Accessed on 17th Dec 2018.
 4. 4. Health library. Liver Anatomy and Functions. Johns Hopkins Medicine. Available at https://www.hopkingmedicine.org/healthbrary/conditions/liverbillary_and_pancreatic_disorders/liver_anatomy_and_functions_85,P00676. Accessed on 26th Dec. 2018.
 5. 5. Behzad Hajarizadeh, Jason Grebely. Gregory J. Dore. Epideminology and natural history of HCV infection. Nat Rev Gastroentrola Hepatol 2013;10(9):553-62.
 6. 6. Puri P. Anand AC, Saraswat VA, Acharya SK, Dhiman RK, Aggrawal R. et. at. Consensus Statement of HCV Task Force of the Indian National Association for Study of the Liver (NASL). Part I: Status Report of HCV infection in India. J Clin Exp. Hepatol 2014;4(2):106-116.
 7. 7. Dhiman RK. Future of therapy for Hepatitis C in India. A matter of Accessibility and Affordibility ? J Clin Exp Hepatol 2014:4(2) 85-6.
 8. 8. Amirthalingam R and Pavalakodi VN. Prevalence of HIV 1, HCV and HBV infections among inhabitants in Chennai City at Hi-tech Center, Tamil-Nadu-India Medical Science 2013;3(8)24-28.
 9. 9. The progression of Liver Disease. American Liver Foundation. Available at https://liverfoundation.org./forpatients/about the-river/the-progression-of-river-disease/#1503432164252-f19f7e9c-0374. Accessed on 20th Dec 2018.
 10. 10. Liver Cancer American Liver Foundation. Available at https://liverfoundation.org/for/patients/about-the-river/disease-of the liver/liver-cancer/ Accessed on 20th Dec 2018.
 11. 11. Chopra S. Patient education: Hepatitis C (Beyond the Basics) Up To Date. Available from http://www.uptodate.com/contents/hepatitis-c-beyond-the basics. Accessed on 22nd March 2015.
 12. 12. NIH. What I need to know about Hepatitis C. Available from http://www.niddk.nih.gov/health/information/health - topics/liver-disease/hepatitis-c-Pages/ez.aspx. Accessed on 22nd March 2014.
 13. 13. CDC Hepatitis C Information for the Public. Available from : http://www.cdc.gov/hepatitis/c/cfaq.htm.
 14. 14. Viral Hepatitis, Diet and Nutrition: Entire Lesson. United States Department of Veterans Affairs. Available at https://www.hepatitis.va.gov/patient/daily/diet/single-page.asp. Accessed on 26th Dec 2018.
 15. 15. Hepatitis C. Key Facts World Health Organization, Retrieved from https://www.who.int/news-room/factsheets/detail/hepatitis-c. Accessed on 11th Dec 2018.
 16. 16. How hepatitis C is not transmitted. Hepatitis C: Transmission and prevention. infohep. Available at http://www.infohep.org/How-hepatitis-C-is-not-transmitted/page/2620968. Accessed on 11th Dec. 2018.