हेपाटयटिस बी
बद्दल अधिक
जाणून घ्या

हिपॅटायटीस काय आहे?

“हिपॅटायटीस” म्हणजे यकृताचा दाह किंवा आजार होय. यकृत हा एक महत्त्वाचा अवयव आहे जो पोषक घटकांवर प्रक्रिया करतो, रक्ताचे शुध्दीकरण करतो आणि जंतुसंसर्गाला रोखतो. यकृताच्या दाहात, आजारात किंवा इतर कारणांनी झालेल्या यकृतातील बिघाडामुळे या महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. अतिरिक्त मदिरापान, विषारी पदार्थांचे सेवन काही औषधांचे सेवन आणि काही आजार यांच्यामुळे हिपॅटायटीस होऊ शकत पण बहुधा हिपॅटायटीस हा विषाणूंच्या संसर्गामुळे होतो.1

हिपॅटायटिस बी काय आहे?

हिपॅटायटिस बी हा हिपॅटायटिस बी या विषाणूच्या संसर्गामुळे होणारा यकृताचा एक गंभीर आजार आहे. त्याला एचबीव्ही असे संक्षिप्त नाव आहे.1

एखाद्याला विषाणूचा संसर्ग झाल्यावर पहिल्या 6 महिन्यांमध्ये होणारे अल्पकालीन संक्रमण म्हणजे लघु हिपॅटायटिस बी. अशा संक्रमणाच्या तीव्रतेची व्याप्ती काही मोजक्या किंवा अजिबात न दिसणार्‍या लक्षणांपासून ते रुग्णालयात दाखल कराव्या लागणार्‍या गंभीर स्थितीपर्यंत असू शकते.1

जीर्ण किंवा जुना हिपॅटायटिस बी म्हणजे हिपॅटायटिस बी विषाणूचा आयुष्यभर झालेला संसर्ग. अगदी लहानपणी हिपॅटायटिस बी चे संक्रमण झालेल्यांपैकी 90 टक्के मुलांना असा जीर्ण हिपॅटायटिस बी आजार होतो. या उलट, सुमारे 5 टक्के प्रौढांना जीर्ण हिपॅटायटिस बी आजार होऊ शकतो. हिपॅटायटिस बी या आजारामुळे काही काळानंतर आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात, जसे की यकृत निकामी होणे, सिर्‍हसिस, यकृताचा कर्करोग आणि अगदी मृत्यूही होऊ शकतो.1

भारतामध्ये किती प्रमाणात हिपॅटायटिस बी हा आजार होतो?

जगभरात, अंदाजे 240 दशलक्ष लोक हेपटायटिस बी व्हायरसने (एचबीव्ही) संक्रामित आहेत. भारतात एचबीव्ही चा संसर्ग झालेल्यांची संख्या सुमारे 3.0 टक्के असून त्याचे सगळ्यात जास्त प्रमाण आदिवासी लोकांमध्ये आहे. सव्वाशे कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतात 3 कोटी 70 लाख यापेक्षा जास्त एचबीव्ही ग्रस्त लोक आहेत आणि जगभरातील एचबीव्हीच्या रोगांच्या संख्येत या आकड्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.2

हिपॅटायटीस बी कशामुळे होतो?

हिपॅटायटिस बी हा आजार हिपॅटायटिस बी या विषाणूमुळे होतो. हिपॅटायटिस बी विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रक्त, वीर्य, किंवा इतर सर्वांच्या संपर्कात आल्याने या विषाणूचे संक्रमण होते. हे संक्रमण पुढील गोष्टींमुळे होऊ शकते3

 • हिपॅटायटीस बी ने ग्रस्त असलेल्या मातेच्या पोटी जन्म झाल्याने
 • हपॅटायटीस बी ने ग्रस्त असलेल्या व्यक्तीशी असुरक्षितरीत्या शरीरसंबंध ठेवल्यामुळे
 • हिपॅटायटीस बी ने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या औषधाच्या सुया किंवा इतर औषधी साहित्य वापरल्यामुळे
 • संसर्गजन्य व्यक्तीने वापरलेली सुई अपघाताने टोचल्यास
 • हिपॅटायटीस बी ने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने वापरल्यानंतर नीट स्वच्छ आणि निर्जंतुक न करता गोंदण्याच्या सुया किंवा इतर साधने वापरल्यामुळे
 • हिपॅटायटीस बी ने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या रक्त किंवा उघड्या जखमांच्या संपर्कात आल्याने
 • हिपॅटायटीस बी ने ग्रस्त असलेल्या व्यक्तीचे दाढीचे पाते, टूथब्रश किंवा नेल क्लिपर वापरल्याने

हिपॅटायटीस बी च्या संसर्गाची लक्षणे काय आहेत?

विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर, आजारास सुरुवात होईपर्यंत 1.5 ते 6 महिन्यांचा (सरासरी 4 महिने) इनक्यूबेशन कालावधी असतो. लघु टप्यामध्ये (संक्रमण झाल्यावर पहिले 6 महिने) बहुतांश व्यक्तींमध्ये आजाराची लक्षणे दिसत नाहीत किंवा थोडासा त्रास होतो. लघु हिपॅटायटीस ची लक्षणे, जेव्हा दिसतात, तेव्हा अशी असतात:4,5

हिपॅटायटीस बी या आजारावर उपचार कसे केले जातात?

ज्यांना लघु तीव्र हिपॅटायटीस बी असतो त्यांना डॉक्टर सहसा आराम करणे, पुरेसा पोषक आहार घेणे, द्रव पदार्थ अधिक घेणे आणि काळजीपूर्वक वैद्यकीय निगा राखणे याची शिफारस करतात. काही लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. जीर्ण किंवा जुना हिपॅटायटीस बी आजार असलेल्या रुग्णांच्या यकृतासंबंधी तक्रारींचे निदान आणि निराकरण योग्य पद्धतीने आणि नेहमी केले पाहिजे. यकृताचा आजार कमी करणारे किंवा त्याच्या प्रभावास प्रतिबंध करणारे उपचार उपलब्ध आहेत.1

हिपॅटायटीस बी च्या संक्रमणाचा धोका कोणाला असतो?

 • इंजेक्शनद्वारे औषधे घेणारे
 • हेमोडायलेसीसचे रुग्ण
 • रक्ताच्या संपर्कात येऊ शकणारे आरोग्य सेवा आणि सार्वजनिक सुरक्षा कामगार
 • एचबीव्ही - संसर्ग झालेल्या जोडीदारासह समागम करणारे लोक
 • सजातीय, म्हणजे पुरुषासह, शरीरसंबंध ठेवणारे पुरुष
 • एचबीव्ही-संक्रमण झालेल्या व्यक्तीसह एकाच घरात राहणारे लोक
 • हिपॅटायटीस बी संसर्ग भरपूर असलेल्या ठिकाणी जाणारे प्रवासी, ज्यांचा स्थानिक लोकांशी सतत जवळचा संपर्क येतो

मला हिपॅटायटीस बी झाला आहे हे मला कसे समजेल?

तुमची वैद्यकीय आणि कौटुंबिक पाश्र्वभूमी, ष्षारीरिक तपासणी आणि रक्ताच्या चाचण्या या सगळ्यांचा वापर करून डॉक्टर हिपॅटायटीस बी या आजाराचे निदान करतात. तुम्हाला हिपॅटायटीस बी असल्यास, तुमच्या यकृताची तपासणी करण्यासाठी डॉक्टर अतिरिक्त चाचण्या करू शकतात जसे की ट्रांन्सिअंट इलास्टोग्राफी, तुमच्या यकृताचे एक विशेष अल्ट्रासाऊंड आणि यकृताची बायॉप्सी.3

हिपॅटायटीस बी या आजाराला प्रतिबंध करता येतो का?

होय. हिपॅटायटीस बी या आजाराला प्रतिबंध करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लसीकरण करवून घेणे. हिपॅटायटीस बी ची लस सहसा 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये सलग तीन मात्रांमध्ये दिली जाते. दीर्घकालीन संरक्षणसाठी या लसीकरणाची पूर्ण मात्रा घेणे गरजेचे आहे.1

स्वतःची चाचणी करवून घ्या

कृपया नोंद घ्या: तुम्हाला मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम व्यक्ती म्हणजे तुमचे डॉक्टर. या शैक्षणिक माहिती पत्रकातील माहिती तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला दिलेल्या वैद्यकीय सल्ल्याची जागा घेत नाही. तुमच्या वैद्यकीय स्थितीबाबत तुम्हाला कोणतीही शंका असल्यास नेहमी तुमच्या डॉक्टरांना किंवा पात्र आरोग्य प्रदात्याला विचारा.

अस्वीकृती:

येथे प्रकाशित महिती निव्वळ हेपटायटीसबद्दल जागरूकता व ज्ञानवृध्दीसाठी आहे. कोणत्याही त्रयस्थ पक्षांप्रतिचे संदर्भ आणि/ किंवा लिंक यांनी मायलनतर्फेचा शेरा किंवा वॉरंटी प्रस्थापित होत नाही. जरी येथे दिलेली माहिती अचूक व अद्यतन असल्याची कसून खात्री केलेली असूनही, येथे प्रकाशित सामग्रीमार्फत प्रसार होणार्‍या कोणत्याही माहितीच्या अचूकतेबाबत मायलनचे कोणतेही उत्तरदायित्व नसून त्याचे प्रतिनिधित्व करत नाही तसेच कुठल्याही चुकीच्या, सुटले गेल्यामुळेचे परिणाम- कायदेशीर किंवा अन्यथा, इथे पुरवलेल्या माहितीच्या वापरामुळे आणि त्यापासून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही गोष्टींसाठी उत्तरदायी धरता येणार नसून मायलन त्यांचे स्पष्टरीत्या अस्वीकरण करते.

हेपटायटीसबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपले मार्गदर्शन करण्यासाठी आपले डॉक्टर सर्वोत्तम व्यक्ती आहेत. येथे पुरवलेली माहिती आपल्या डॉक्टरने दिलेल्या महितीला प्रतिस्थापित करत नाही.

References:

 1. 1. CDC Hepatitis B – General Informations. Available from https://www.cdc.gov/hepatitis/hbv/pdfs/HepBGeneralFactSheet.pdf. Accessed on 25th July 2018.
 2. 2. Pankaj Puri et al. Tackling the Hepatitis B Disease Burden in India. J Clin Exp Hepatol. 2014 Dec; 4(4):312–319.Published online 2014 Dec 15. doi: 10.1016/.j.jceh.2014.12.004.
 3. 3. U.S. Department of health and Human services. SAN FRANCISCO DEPARTMENT OF PUBLIC HEALTH.DISEASE PREVENTION & CONTROL. Available from https://www.sfcdcp.org/infectious-diseases-a-to-z/d-to-k/hepatitis-b/. Accessed on 25th July 2018.
 4. 4. POPULATION HEALTH DIVISION. SAN FRANCISCO DEPARTMENT OF PUBLIC HEALTH.DISEASE PREVENTION & CONTROL. Available from https://sfcdcp.org/infectious-diseases-a-to-z/d-to-k/hepatitis-b/. Accessed on 25th July 2018.
 5. 5. Web.stanford.edu. (2018). Hep B Patient Ed. [online] Available at: http://web.stanford.edu/group/virus/hepadna/2004tansilvis/Patient%20Ed.htm. [Accessed 16 Aug. 2018]